माझी संशोधन जननी : डॉ. शैलजा शिरवैकर
अलोक पवार
कधीतरी आपल्याला वर पक्षी बघून उडावेसे वाटते. आपल्याला जगामध्ये खूप सुंदर गोष्टी असतात ज्या आत्मसाद कराव्याश्या वाटतात. शाळेत असताना किंवा कॉलेज मध्ये असताना थोड्याश्या पळवाटा शोधूनच प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करावासा वाटतो आणि मी ही त्यातलाच एक मात्र ज्या सुंदर गोष्टींबद्दल मी सुरवातीला बोललो त्या तशा पळवाटा काढून मिळत नसतात. सुदैवाने मला माझी पदव्युत्तर पदवी मिळाल्यावर लगेचच शिक्षण क्षेत्रात नोकरी लागली. मात्र ती टिकवण्यासाठी तितके शिक्षण पुरेसे नव्हते हे देखील लक्षात आले. मग काय चला आता पीएचडी होऊ शकते का?, नावापुढे डॉक्टर्स लागू शकते का? या सुंदर गोष्टीसाठी मन सैरभैर होऊ लागले. पीएचडी नाही मात्र एम.फील. ला आणि पुण्यातल्या एका नावाजलेल्या महाविद्यालयात नोरोसजी वाडिया मध्ये प्रवेश मिळाला. अभ्यास करून गाईड मिळवणे हे देखील जोखमीचे काम लागले. पण घेतलेल्या विषयात कोण गाईड मिळेना. म्हणून कधी ना सामोरे गेलेल्या संगणक विभागाच्या डॉ. शैलजा शिरवैकर मॅडमला जाऊन भेटलो. त्यांची ओळख फक्त प्रवेशाच्या वेळी झाली होती. मात्र बऱ्याच इतर सहकाऱ्यांच्या तोंडून मॅडम थोड्या कडक आहेत असे एकले. तसे अगदी सुरवातीला जाणवले देखील.
एक बी.एस्सी. संगणक शास्त्र प्रथम वर्षांत शिकणारा विद्यार्थी मॅडमकडे बोनाफाईड मागणी करीत होता. आणि मॅडम "तुझी हजेरी किती? का तुझ्या इतक्या कमी हजेरीने तुला बोनाफाईड द्यायचे", अशी पूर्णपणे त्या विद्यार्थ्यावर खडाजंगी अशी तासणी करीत होत्या. त्याच्या नंतर माझा नंबर होता. मला मनात असे वाटत होते की मॅडम असे बोलतील काय तुम्ही शिक्षक तुम्हाला मार्गदर्शक भेटत नाही असे माझेही काहीतरी होईल. मात्र मॅडमने मला अगदी 'अहो- जाहो'ने सुरवात केली. मला अगदीच विचित्र वाटले मात्र तरीही मला मॅडमने गाईड शोधण्यासाठी एक आठवडा प्रयत्न करायला सांगितले. मात्र एक आठवड्याने देखील मी निराश हतबल असा मॅडम समोर नाही भेटला असे सांगायला गेलो. वर कसे बसे मॅडम तुम्हीच बनता का माझ्या गाईड हे विचारण्याचे धाडस केले. मॅडमने क्षणाचा विलंब न करता त्वरित मला 'हो' म्हणून सांगितले. पुढच्या एक - दीड वर्षात माझे एम. फील. चे संशोधन अगदी लिहून पूर्ण झाले.
हा एम. फील. चा प्रबंध लिहिताना मी केलेले काम मी मॅडमला इमेल करायचो आणि मॅडम ते लगेच तपासून अगदी इंग्रजी व्याकरण तपासून बरोबर करून पाठवायच्या. माझे एम. फील. चे संशोधन रेशन म्हणजे सरकारी स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर आधारित होते. त्याची ऐतिहासिक माहिती लिहिताना मी चक्क एक अन्य संशोधकाने त्याच्या प्रबंधामध्ये लिहून ठेवलेली माहिती आहे तशीच 'कॉपी' आणि 'पेस्ट' केली. मी मनात विचार केला कि इतिहास कसा बदली करायचा. आणि मी थेट तशीच्या तशी कॉपी माझ्या संशोधनात मांडली. मॅडमने मला अगदी मी कोठून ती वांग्मयचोरी केली त्या लिंक सकट मला ईमेलचा प्रतिसाद देऊन पाठवला आणि महाविद्यालयात येऊन भेटा असा निरोप दिला. ठरलेल्या वेळेनुसार मी महाविद्यायात पोहोचलो. त्यांनी मला व्यवस्थित पणे दुसऱ्याच्या संशोधनातून जर काही घेतले असेल तर त्याची वाक्यरचना कशी असावी, त्याला संदर्भ कसा दिला पाहिजे हे अगदी उत्तम सांगितले.
त्या भेटीत मॅडमला मी मला अहो जाहो नका करत जाऊ मी लहान आहे हे सांगितले. मॅडम मुळच्या गोव्याच्या त्यांच्या तिकडे माका - तुका म्हणजेच अगदी प्रत्येकाला एकेरीने संबोधण्याची सवय आहे. त्या सवयीने पुण्यात झालेल्या मज्जा त्यांनी मला शेअर केल्या मात्र काही असो मला अलोक अशा एकेरी नावानेच हाक मारायची ही कबुली मी त्यांच्याकडून घेतली.
माझे एम फील. चे संशोधन पूर्ण होत होते. मी साधारण रोज दुपारी वाडिया मध्ये जाऊन बसायचो. मॅडम माझ्या बाजूला बसून शब्द आणि शब्द इंग्रजीच्या व्याकरणासहित माझे सर्व संशोधन तपासात होत्या त्यांनी मला संशोधन पेपर देखील लिहायची सवय लावली. मी वाडिया मध्ये गेल्यावर आम्ही दोघे ते बघण्यात इतके गुंग व्हायचो की वाडियाचे शिपाई विचारायला यायचे की, "अजून किती वेळ बसणार आहे म्हणजे कुलूप लावायला यायला". मॅडम त्वरीत मला चल घरी बसुयात असे म्हणून त्यांच्या घरी घेऊन जायच्या. मॅडम च्या घरी खूप मस्त थाट होता. हॉलमध्येच डायनिंग टेबल वर आम्ही बसायचो. आणि सर मस्तपैकी आम्हाला चहा करून आणून द्यायचे. एकंदरीत अशा प्रयत्नांनी माझे एम. फील पूर्ण झाले. मी मॅडम च्या शेजारी बसून काम केले ना त्यात मी बऱ्याच गोष्टी शिकलो. संशोधन साक्षात कसे करायचे असते याच बरोबर मी कसे करायचे नसते हे देखील शिकलो. प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यास कसा करायचा असतो, प्रत्येक बाबतीत स्वतः स्वतःला improve करायचे असते हे मी शिकत गेलो.
पुढे काय माझे लग्न झाले, प्राचार्य पदी विराजमान झाल्यावर आमच्या कॉलेज मध्ये मॅडम ला पदवीप्रदान कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलावले. माझ्या विद्यार्थ्यांना मॅडमने भविष्यवेध घेणारे योग्य मार्गदर्शन केले.
पुढे माझा प्रवेश पीएचडी ला झाला. गाईड मॅडम नव्हत्या, पण मला मॅडम चा गाईडन्सची इतकी सवय झाली होती की संशोधन आणि मॅडम चे त्यात नसणे हे काहीसे राहिल्यासारखे होऊ शकते. माझा विषय विद्यापीठाने मंजूर केल्यावर मी त्यांच्याकडे खूप दिवसांनी भेटणार होतो म्हणून फळे घेऊन गेलो होतो, आणि अगदीच मनातला प्रश्न मॅडम मागे तुम्ही मला जेंव्हा मार्गदर्शन केले ना तेंव्हा माझ्या तुम्ही गाईड होत्या पण आता मला तुमचे तितकेच मार्गदर्शन हवे. पण गाईड तुम्ही नाहीत, मग अशी पीएचडी ची काही मार्गदर्शन फिज आहे का ? अगदीच निरागस प्रश्न समोरून आल्यावर मॅडम मला तू मला ही फळे आणली ना बस आपल्यात असेच खाऊ चे नाते ठेवायचे फी वैगरे काही नाही. मॅडमच्या या आपुलकी च्या शब्दाने मी दर रविवारी मॅडम येऊ का असेही विचारले, मॅडम म्हणाल्या मी आता रिटायर्डमेंटनंतर अगदीच मोकळी आहे. तू रविवारी काय कधीही संध्याकाळी - रात्री आलास ना तरीही हरकत नाही. माझा रविवारचा दिवस संशोधन दिवस होऊ लागला. आठवड्यात जे काम केले त्याचे रविवारी तपासणी सोहळा होऊ लागला.
मॅडमच्या बाजूला बसून मी जे काम पूर्ण करायचो ना ती माझ्यासाठी पर्वणी होती. संशोधन मॅडमच्या नसानसात भरले आहे असे मला जाणवायचे. मी केलेली छोटीशी चूक पण मॅडम बारकाव्याने बघायच्या. त्या मला फक्त संशोधन विद्यार्थी नाही तर भविष्यातील पुढचा मार्गदर्शक म्हणून तयार करत आहेत हे मला सतत जाणवायचे. रविवार पूर्ण दिवस काम करायचे. जेवण देखील मॅडम कडेच करायचे. मॅडम मला संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक कधीही न खाल्लेला गोड गोवा स्पेशल पदार्थ करून खाऊ घालायच्या. आणि असे संशोधन आम्ही एन्जॉय करत शेवटी माझे पीएचडी अंतिम टप्यात आणले आहे. माझे अजून रविवार बाकी आहेत. पण मी अजूनही माझे संशोधन संपवायच नाही, आणि रविवार असाच संशोधन मयी घालवायचा या विचारात आहे.
ते सुरवातीला बोललो ना सर्वांना मॅडम कडक वाटतात पण मला नाही कधीच जाणवले. मॅडम मला कधीतरी काम नाही केले चूक झाल्या तर ओरडतात पण हे सर्व ओरडणे हवे हवेसे वाटते आणि त्यातही एक वेगळी मजा असते.
आपण आईच्या पोटी जन्म घेतो ना तेंव्हा आपण जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून काही जनुके आईचे किंवा वडिलांचे आपल्यात येतात. मॅडम सोबत संशोधनाचे काम करताना माझ्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या संशोधन कसे करायचे, याची संशोधन युक्त जनुके माझ्याकडे त्यांच्याकडूनच आली. अशा माझ्या या संशोधन जननी चा आज वाढदिवस....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मातोश्री.....
आपण शतायुषी होवोत अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना.....💐💐💐
मॅडम विषयी असे एका लेखात लिहून होणे शक्य नाही.. त्यामुळे क्रमशः.....
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका

Happy Birthday Madam.... अपुऱ्या शब्दंग्रहा मूळे जास्त काही बोण्यासाठी जवळ नाहीये पण तुमचा हा लेख वाचुन छान वाटलं.....
ReplyDeleteThanks.... Name plz...
DeleteHappy Birth day ! Dear madam!!
ReplyDeleteThanks ...name please
DeleteWish you happy birthday mam...
ReplyDeleteThanks Name plz
DeleteHappy Birthday Mam... Alok, I am glad that I am also part of this journey.
ReplyDeleteYoohoo ... abhi to long journey hain
DeleteHappy birthday madam!
ReplyDeleteThanks Name plz
Deleteसर खरेच तुम्ही उत्तम प्रकारचे संशोधक बनणार यात तीळमात्र शंका नाही.. यात सर्वात मोठा वाटा असेल तो शिरवाईकर मॅडम चा. त्यांचे मार्गदर्शन ते सुद्धा एवढ्या जवळून मिळणे म्हणजे पर्वणीच..
ReplyDeleteमॅडम ला माझ्याकडुन सुद्धा वाढदिवसाच्या मनसोक्त शुभेच्छा!!
भाग्यवान आहे मी😀😀😀😀
Deleteमॅडम चा विद्यार्थी दिलीप बरागडे
ReplyDelete