Thursday, 19 November 2020

इंदिरा गांधी

 

इंदिरा गांधी



भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आजही जगाच्या कानाकोपऱ्यातून इंदिरा गांधी याचं नाव हे अतिशय सन्मानपूर्वक घेतले जाते. त्यांची प्रतीभाशैली आणि राजनैतिक दृष्टीकोन याला पाहता इतिहासामध्ये त्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. या लेखामध्ये फक्त इंदिरा गांधी यांची शैक्षणिक माहिती आणि त्यांनी कृषीक्षेत्रामध्ये केलेले बदल इतकाच समावेश आहे.  

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या इंदिरा गांधी या कन्या. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीकोनातून नेहरूंचे पूर्णपणे लक्ष देशाकडे होते. त्याचबरोबर ते शिक्षणाला देखील महत्व देत होते. त्यामुळेच त्यांनी इंदिरा गांधी यांच्या शिक्षणाची व्यवस्था स्वगृहीच केली होती. यामध्ये इंदिरा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मात्र इंदिरा गांधी यांनी इंग्रजी व्यक्तिरिक्त कोणत्या विषयामध्ये विशेष करून प्रभावशाली अभ्यास करू शकल्या नाहीत. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते. इतक्या विविध ठिकाणी शिकून त्यांचे कोणत्याही प्रकारचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले नाही.

इंदिरा गांधी या लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रीय अशा दिसल्या. त्यांनी त्यांच्या लहानपणीच बाल चरखा संघ स्थापन केला तसेच कॉंग्रेसच्या मदतीसाठी  असहकार चळवळ जी ब्रिटीशांच्या विरोधात उभी राहिली होती त्यात सहयोग म्हणून लहान मुलांच्या साथीने 'वानरसेना' उभी केली होती.

भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. आधी याच भारतामधून सोन्याचा धूर निघत होता तो याच कृषीसंस्कृतीवर आधारित आहे. भारत स्वातंत्र्यात येऊन ब्रिटिशांची राजवट, त्यांची हुकुमत भारतावरून संपली मात्र बऱ्याच नवीन संकटांना भारत सामोरे जात होता. ज्यामध्ये भारत देश शेजारील इतर देशांच्या नवीन कारस्थानास सामोरे जात होता. चीन आणि पाकीस्थान नवीन कुरघोड्या करून भारताशी युद्ध करू इच्छित होता. एखादा देश समोरून विविध कारणांनी युद्ध करतोय तेंव्हा भारतातील त्या त्या काळातील पंतप्रधानांची ती नैतिक जवाबदारी असते की देशातील नागरिकांचे युद्धामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. १९६२ साली भारत - चीन युद्ध झाले त्यानंतर १९६५ साली भारत पाकीस्थान युद्ध झाले. युद्धामध्ये जे शस्त्र, रणगाडे, साधन सामग्री लागते त्यामध्ये प्रत्येक देश बराच आर्थिक भाग उचलत असतो. भारताची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था या युद्धांमुळे खिळखिळी झाली होती. ही अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याची जवाबदारी त्या काळी इंदिरा गांधी यांनी उचलली. त्या काळी गरिबी हटाओ हा एक आमुलाग्र बदल करणारा कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी हाती घेतला. देश गरीब आहे आपण तेंव्हा म्हणतो जेंव्हा देशातील जनता गरीब आहे. बर ही गरीब जनता उद्योगधंदे वाढवून कारखानदारी वाढ करून करू शकतो यापेक्षा या भारत देशामधील प्राथमिक कार्य जे आहे ज्याने भारतीय माणसांची ओळख आहे त्या कृषी व्यवस्थेला चालना देण्याचे काम हातात घेतले. आपण जेंव्हा भारतला कृषीप्रधान देश म्हणतो अशा वेळी जरी परिस्थिती आली तरी अन्य देश प्रामुख्याने संयुक्त राष्टांकडे अन्नाचा तुटवडा भरून काढण्यासाठी मदत मागणे हे कुठेतरी चुकीचे आहे भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मग आपण भारतवासीयांनीच जागृत होऊन प्रयत्न केले तर ते काहीसे भविष्यवेधी ठरू शकते. यासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडूनही शेतकरी त्याचा स्वीकार करतील हे त्वरित शक्य होणारी गोष्ट नव्हती. मात्र शेतीमधील बदल, पुढे मालाचे मार्केटिंग, व्यापारांपर्यंतची विक्री साखळी या सर्व गोष्टींसाठी संपूर्ण भारतभर जोरदार प्रयत्न झाले. आणि त्याचकाळी भारतामध्ये हरितक्रांती झाली. भारताने काहीच दिवसांमध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये इतकी प्रगती केली की देशाची अर्थव्यवस्था या गोष्टीने पूर्ववत येण्यास सुरवात झाली. आणि जो भारत देश अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता, शेतमाल किंवा अन्नधान्य आयात करीत होता तोच भारत देश आता या सर्व गोष्टी निर्यात करीत होता. आणि या सर्व प्रवासाचा सर्व स्टेअरिंग हा इंदिरा गांधी यांनी सांभाळला होता.   

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका 

एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.बी.ए.,

एम.एस्सी. संप्रेषण - भौतिक शास्त्र, एम.फील.     

Sunday, 8 November 2020

गृहिणी: या Profession विषयी.....

 

गृहिणी: या Profession विषयी.....

नुकताच ३ नोव्हेंबर २०२० रोजी जागतिक गृहिणी दिन साजरा केला. म्हणून त्या profession विषयी लिहाव म्हणल. सर्वसाधारणपणे जेंव्हा विद्यार्थी दशेत पालक किंवा अगदी विद्यार्थी देखील शालेय किंवा महाविद्यालयीन अर्जावर पालकांचा व्यवसाय असे लिहावयाचे असते तिथे वडिलांचा आहे तो व्यवसाय किंवा नोकरी याबद्दल व्यवस्थित लिहिले जाते. मात्र ज्यांची आई घरी असते तिच्या समोर 'गृहिणी' असे लिहिले जाते. एखादे वडील जेंव्हा निवृत्ती घेऊन घरचे काम करतात तेंव्हा मात्र त्याच्यापुढे 'निवृत्त' किंवा इंग्रजीमध्ये 'Retired' असे लिहिले जाते. भले असा गृहस्थ पुरुष निवृत्त झाल्यावर आपल्या पत्नीला जेवण करणे, झाडू मारणे, धुणे- भांडी या गोष्टींमध्ये मदत करत असेल.

गृहिणी हा शब्द मुळात गृह या शब्दापासून तयार होऊन पुढे स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रियांसाठी बनला आहे. घराला सांभाळणारी, घराला माया देणारी आणि आजकाल बोलवायचे झाले तर त्याला Homemaker असा मस्तपूर्ण शब्द दिला गेला आहे. खर तर आपण जेंव्हापासून घरी राहणाऱ्या आपल्या आईला बघत आहे तेंव्हा ती एक गृहिणी म्हणून आपल्यासमोर ती उभी राहिलेली आहे. घरी राहून कोणत्याही कामाला मग ते साफसफाई करणे असेल, अंथरून पांघरून साफ करणे असेल, धुणे- भांडी करणे असेल, स्वयंपाक करणे असेल, परसबागेतील साफसफाई करणे असेल, मुलांचे आवरणे - त्यांचा अभ्यास घेणे असेल, घरातील लहान मुलांपासून वयस्कर माणसांचे पालनपोषण करणे असेल, देवपूजा करणे, पाहुण्याचे आदरातिथ्य करणे असेल घरतील कमावत्या व्यक्तीकडून पैसे मिळाले की सर्व देणेकरी मग त्यात दुधवाला, पेपरवाला, किरणा यांचे नियोजन करणे, रोजच्या भाज्या - लागेल तसा किराणा आणणे, बर या भाज्या -किराणा आणताना घरातील प्रत्येकाच्या पसंती - नापसंतीचा विचार करणे अशा अनेक गोष्टी गृहिणीला लक्षात घ्याव्या लागतात - कराव्या लागतात.

महाविद्यालयात जेंव्हा व्यवस्थापनाचे धडे शिकतो तेंव्हा त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन शिकवले गेले त्यानुसार गृहिणी त्यांच्या वेळा पाळणे यामध्ये तरबेज असतात. म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी नाश्ता झाला पाहिजे, दोन्ही जेवणाच्या वेळी जेवण तयार असते, दुपारी फावल्या वेळात भाज्यांच्या तयारी हे सर्व अगदी वेळेतच असते. त्याचसोबत आम्ही जेंव्हा Service Industry Management  म्हणजेच सेवा पुरविणाऱ्या संस्थाचा विचार करतो तेंव्हा त्या त्यांच्या ग्राहकाला अगदी समाधान मिळेल या पद्धतीने कार्यरत असतात. लहान मुलांच्या डब्यात त्याला चपाती तोडता येत नाही म्हणून तुकडे करून देणे, मिरच्या तोंडात गेल्या की तिखट लागेल म्हणून भाज्यांमधून मिरच्या काढून देणे, वयस्कर माणसांच्या गोळ्या नाश्त्याच्या आधी - नंतर याची तजबीज करणे, त्यांच्या आहारात जर डॉक्टरांनी काही बदल सांगितले असतील तर त्यानुसार भोजनाच्या सोई करणे. आणि त्याही या सर्व व्यक्तींच्या जागेवर देणे ही एक प्रकारची सेवा पुरवली जाते. 'मामाची बायको सुगरण - रोज रोज पोळी शिकरण' हे जे बालकाव्य आहे ते नेहमीच कुठेतरी Marketing Management म्हणजेच विपणन व्यवस्थापनाचा आभास करून देतात. कारण दिवाळी असो किंवा अन्य धर्माचे कोणतेही सण असो फराळाची जी रेलचेल होते त्यावेळी अमुक - तमुक काकू - मामी - मावशी च्या हाताला चव आहे बर का आणि म्हणून ती काकू - मामी - मावशी तो पदार्थ अगदी व्यवस्थित पणे त्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असते. घरावर आर्थिक संकट आल्यास हीच कलाकुसर या गृहिणींना लोणचे - पापड किंवा असे गुह-उद्योग करून पैसा मिळवून देण्यास मदत करतात. तेंव्हा या महिला Business Entrprenership चे देखील काम सांभाळतात. मात्र अशा वेळेस या महिलांना आपण गृहिणी म्हणणे सोडून 'व्यावसायिका' हा शब्द वापरल्यास योग्य ठरेल असे माझे मत आहे.  महिन्याच्या शेवटी थोडे पैसे कमी झाले किंवा घरावर आर्थिक संकट कोसळले तरीही घरातील व्यक्तींच्या रोजच्या जीवनावर कोणताही परिणाम घडू नये यासाठी घरातील Finance management म्हणजेच वित्त व्यवस्थापन देखील गृहिणीकडूनच होत असते. घरातील लहान मुलांना शाळेतील अभ्यास सोप्या भाषेत शिकवणे त्याचे Training अगदी त्यांच्या कलेकलेने देणे आणि त्यांना पुढील आवाहनाला सक्षम बनविणे, घरातील प्रत्येकाला त्यांच्या रोजच्या कामात मदत करून त्यांना कामाची दिशा दाखवून मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजेच Human Resource Management देखील व्यवस्थित पणे सांभाळण्याचे काम गृहिणी करीत असते. याठिकाणी 'तुझ्या आईने काही शिकवले की नाही' हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून अगदीच गृहकृत्यदक्ष पणे गृहिणी सर्व कामे चोखपणे सांभाळत असते. एकंदरीत ऑल राउंडर परिपूर्ण - स्वयंपूर्ण अशी ही गृहिणी कोणत्याही कामाला कोणताही संकोच न बाळगता स्वीकारून पूर्णत्वाच्या दिशेने नेत असते.

आता आपण थोडे स्त्रियांच्या दुसऱ्या profession व्यवसायांचा जर विचार केला म्हणजे गृहिणी सोडून इतर तर महिला आज बऱ्याच क्षेत्रात अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात आणि त्याबदल्यात त्याचा मोबदला म्हणून त्यांना त्या संस्थेकडून वेतन दिले जाते. शेतकरी स्त्रीला देखील तिचे देय वेतन मिळते. मात्र अजूनही शेतात भरपूर राबून शेतकरी स्त्री असते, अशी संकल्पना रुजायला वेळ लागतो आहे. व्यावसायिक म्हणजेच एखादी डॉक्टर, वकील, भाजीवाली स्त्री स्वतःचे पैसे आपल्या व्यवसायानुसार कमवून त्याचा उपभोग घेते. इतकेच काय घरात कामाला ठेवलेली कामवाली स्त्री ही देखील कामाला अनुसरून रक्कम ठरवते आणि तसा मोबदला ती मालकांकडे मागते. मात्र तीच सर्व कामे जर घरातील गृहिणी करीत असेल तर तिला कोणत्याही प्रकारचे वेतन नसते. मोलकरीण संघटनेच्या दृष्टीकोनातून घरी काम करणाऱ्या स्त्रियांना सुट्ट्या दिल्या पाहिजेत, त्यांना सणासुदीच्या दिवशी पगारामध्ये बोनस सारख्या सुविधा दिल्या पाहिजेत असे प्रयोजन पुढे येताना दिसते. तसेच या स्त्रियांच्या कामाची वेळ देखील ठरविक निश्चित केली जाते. मात्र तुलनेने हेच सर्व गृहिणीच्या बाबतीत बघितले तर तिला कोणत्याही प्रकारचे देय मिळत नाही. आणि घरातील कामाला येणाऱ्या स्त्रीच्या तुलनेने जास्त काम करावे लागते तेही कोणत्याही सुट्टीशिवाय. म्हणजेच या profession ला कोणत्याही प्रकारची security अशी नाही बाहेर काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना पात्र आस्थापनेकडून पीएफ, मेडिकल फंड अशा अनेक सुविधा दिल्या जातात मात्र घरातील काम करणाऱ्या गृहिणींना या कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत.

चित्रपटाद्वारे अथवा सिरीअल्यमधून अशा प्रकारच्या गृहिणी स्त्रियांचे उदात्तीकरण केले जाते. त्या किती महान आहेत हे दाखविले जाते. घरी राहणाऱ्या स्त्रिया अगदी सुंदर-सुंदर कपडे घालून किंवा भरपूर दागिने घालून किचनमध्ये स्वयंपाक करताना दाखविल्या जातात. सुप्रसिद्ध इंग्लिश विन्ग्लीश या श्रीदेवीच्या गाजलेल्या चित्रपटातून घरातील स्त्री ही कसे बाहेरील जगमाध्येच नाही तर घरातील पती आणि मुलांकडून देखील नाकारली जाते आणि त्यासाठी तिची धडपड हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर कहाणी घर घर की, क्योकी सासं भी कभी बहू थी, सास निभाना साथिया अशा एकता कपूरच्या सिरिअल्स मधून देखील स्त्रियांनी कसे घर सांभाळले पाहिजे या गोष्टींचे प्रकटीकरण केले आहे. अनुपमा नावाच्या एका सीरिअलमधून घरतील एका स्त्रीने कसे संपूर्ण कुटुंब सांभाळून घरातील प्रत्येक गोष्टींबद्दल निष्टावंत राहायचे असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकटीकरणाकडे न पाहता स्त्रियांच्या गृहिणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जरीही एका स्त्रीला गृहिणी बनण्यात उत्सुकता असेल तरीही त्याकडे व्यवस्थापन, किंवा श्रमाचे प्रतिफळ या दृष्टीकोनातून सर्वांनी पहिले तर योग्य राहील. स्त्रियांच्या शिक्षणाला अनुसरून गृहिणी ही संकल्पना ही फक्त व्यापक बनली आहे. तसेच ती फक्त स्त्री पुरती मर्यादित न राहून पुरुषांकडे देखील आली आहे मात्र 'गृहस्थ' असा शब्द पुरेसा वापरला जात नाही किंवा त्याला घरी बसलेल्या पुरुषांकडून स्वीकारला जात नाहीये, असे म्हणावयास हरकत नाही. तो चांगल्या पुरुषांसाठी 'सद्गगृहस्थ' असा वापरला जातोय.           

सर्व गृहिणींना त्यांच्या कार्यासाठी सलाम     

 पवार अलोक अर्जुन अलका

एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.बी.ए.,

एम.एस्सी. संप्रेषण - भौतिक शास्त्र, एम.फील.          

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...