इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आजही जगाच्या कानाकोपऱ्यातून इंदिरा
गांधी याचं नाव हे अतिशय सन्मानपूर्वक घेतले जाते. त्यांची प्रतीभाशैली आणि
राजनैतिक दृष्टीकोन याला पाहता इतिहासामध्ये त्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले
आहे. या लेखामध्ये फक्त इंदिरा गांधी यांची शैक्षणिक माहिती आणि त्यांनी कृषीक्षेत्रामध्ये
केलेले बदल इतकाच समावेश आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या इंदिरा गांधी या कन्या. त्यांचा
जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीकोनातून
नेहरूंचे पूर्णपणे लक्ष देशाकडे होते. त्याचबरोबर ते शिक्षणाला देखील महत्व देत
होते. त्यामुळेच त्यांनी इंदिरा गांधी यांच्या शिक्षणाची व्यवस्था स्वगृहीच केली
होती. यामध्ये इंदिरा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मात्र इंदिरा गांधी यांनी
इंग्रजी व्यक्तिरिक्त कोणत्या विषयामध्ये विशेष करून प्रभावशाली अभ्यास करू शकल्या
नाहीत. त्यांनी
इकोले नौवेल्ले, बेक्स
(स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल,
बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज,
ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते. इतक्या विविध ठिकाणी
शिकून त्यांचे कोणत्याही प्रकारचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले नाही.
इंदिरा गांधी या लहानपणापासूनच
स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रीय अशा दिसल्या. त्यांनी त्यांच्या लहानपणीच बाल चरखा
संघ स्थापन केला तसेच कॉंग्रेसच्या मदतीसाठी
असहकार चळवळ जी ब्रिटीशांच्या विरोधात उभी राहिली होती त्यात सहयोग म्हणून
लहान मुलांच्या साथीने 'वानरसेना' उभी केली होती.
भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. आधी
याच भारतामधून सोन्याचा धूर निघत होता तो याच कृषीसंस्कृतीवर आधारित आहे. भारत स्वातंत्र्यात
येऊन ब्रिटिशांची राजवट, त्यांची हुकुमत भारतावरून संपली मात्र बऱ्याच नवीन
संकटांना भारत सामोरे जात होता. ज्यामध्ये भारत देश शेजारील इतर देशांच्या नवीन
कारस्थानास सामोरे जात होता. चीन आणि पाकीस्थान नवीन कुरघोड्या करून भारताशी युद्ध
करू इच्छित होता. एखादा देश समोरून विविध कारणांनी युद्ध करतोय तेंव्हा भारतातील
त्या त्या काळातील पंतप्रधानांची ती नैतिक जवाबदारी असते की देशातील नागरिकांचे
युद्धामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. १९६२ साली भारत - चीन युद्ध झाले
त्यानंतर १९६५ साली भारत पाकीस्थान युद्ध झाले. युद्धामध्ये जे शस्त्र, रणगाडे,
साधन सामग्री लागते त्यामध्ये प्रत्येक देश बराच आर्थिक भाग उचलत असतो. भारताची
बऱ्यापैकी अर्थव्यवस्था या युद्धांमुळे खिळखिळी झाली होती. ही अर्थव्यवस्था
पूर्ववत करण्याची जवाबदारी त्या काळी इंदिरा गांधी यांनी उचलली. त्या काळी गरिबी
हटाओ हा एक आमुलाग्र बदल करणारा कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी हाती घेतला. देश
गरीब आहे आपण तेंव्हा म्हणतो जेंव्हा देशातील जनता गरीब आहे. बर ही गरीब जनता
उद्योगधंदे वाढवून कारखानदारी वाढ करून करू शकतो यापेक्षा या भारत देशामधील
प्राथमिक कार्य जे आहे ज्याने भारतीय माणसांची ओळख आहे त्या कृषी व्यवस्थेला चालना
देण्याचे काम हातात घेतले. आपण जेंव्हा भारतला कृषीप्रधान देश म्हणतो अशा वेळी जरी
परिस्थिती आली तरी अन्य देश प्रामुख्याने संयुक्त राष्टांकडे अन्नाचा तुटवडा भरून
काढण्यासाठी मदत मागणे हे कुठेतरी चुकीचे आहे भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मग
आपण भारतवासीयांनीच जागृत होऊन प्रयत्न केले तर ते काहीसे भविष्यवेधी ठरू शकते.
यासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत.
शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडूनही शेतकरी त्याचा स्वीकार करतील हे त्वरित शक्य होणारी
गोष्ट नव्हती. मात्र शेतीमधील बदल, पुढे मालाचे मार्केटिंग, व्यापारांपर्यंतची
विक्री साखळी या सर्व गोष्टींसाठी संपूर्ण भारतभर जोरदार प्रयत्न झाले. आणि त्याचकाळी
भारतामध्ये हरितक्रांती झाली. भारताने काहीच दिवसांमध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये
इतकी प्रगती केली की देशाची अर्थव्यवस्था या गोष्टीने पूर्ववत येण्यास सुरवात
झाली. आणि जो भारत देश अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता, शेतमाल किंवा
अन्नधान्य आयात करीत होता तोच भारत देश आता या सर्व गोष्टी निर्यात करीत होता. आणि
या सर्व प्रवासाचा सर्व स्टेअरिंग हा इंदिरा गांधी यांनी सांभाळला होता.
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका
एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.बी.ए.,
एम.एस्सी. संप्रेषण - भौतिक शास्त्र, एम.फील.

No comments:
Post a Comment